पिंपरी- चिंचवड: पिंपरी- सौदागर येथील TRIOSE सोसायटीसमोरील रस्ता गेल्या ८ वर्षांपासून रखडलेला होता. अनेक वेळा पाठपुरावा करूनही रस्त्याचे काम सुरू होत नव्हते, त्यामुळे शाळेच्या बस, गर्भवती महिला आणि नागरिकांना या रस्त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
“मी हा नक्की रस्ता करून दाखवेन” असे आश्वासन भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी काही दिवसांपूर्वी नागरिकांना दिले होते. ते दिलेले वचन पाळत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पार पडले.
कार्यक्रमाला या वेळी संजय भिसे, माजी नगरसेविका कुंदाताई भिसे, उद्योजक विजय जगताप, डॉ. अमित नेमाणे यांच्यासह सोसायटीचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काटे म्हणाले, “सामाजिक कार्य हा लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणारा घटक आहे. समाजासाठी काम करताना मिळणारा विश्वास हीच खरी ताकद आहे. माझे काम पाहून अनेक तरुण कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते, ही आनंदाची बाब आहे.”