पर्यावरणपूरक आणि पेट्रोलची बचत करण्यासाठी एका विद्यार्थ्याने बाईकवर संशोधन केलं आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये ही बाईक तब्बल १६० किलोमीटर धावते. या गोष्टीवर अजिबात विश्वास बसणार नाही. पण, हे खरं आहे. इलेक्ट्रीक पेट्रोल हायब्रीड बाईक अस त्या दुचाकीचं नाव आहे. अथर्व राजे अस संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव असून तो सिम्बॉसिस या विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. गगनाला भिडणारे पेट्रोल चे भाव यावर हे संशोधन पर्यायी मार्ग असू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अथर्व राजे या विद्यार्थ्याचे निसर्गावर खूप प्रेम आहे. त्याला प्रदूषण हा शब्दच आवडत नाही. त्यामुळे त्याने बाईकमुळे होणाऱ्या प्रदूषणावर उपाय काढण्याचे ठरवले. अथर्व ने आई जवळील बारा वर्षांपूर्वीची जुनी मोपेड गाडी संशोधनासाठी वापरली. दोन महिने कठोर परिश्रम घेत मोपेड गाडीचा कायापालट करत तीच रंग आणि रूप बदलले. त्यानंतर हळूहळू तिच्या संशोधन केले. तयार झालेली हायब्रीड बाईकमध्ये एक बॅटरी आहे. पेट्रोल तसेच इलेक्ट्रीक बॅटरीवर ही बाईक धावते. ९ किलोमीटर बाईक धावल्यास बाईकमधील आटोमॅटिक बॅटरी चार्ज होईल त्यानंतर ती बॅटरीवर धावेल. ९ किलोमीटर मध्ये तब्बल चार वेळा ही बॅटरी चार्ज होते. मोपेड गाडी किमान ३६ किलोमीटर धावते तर बॅटरी चार्ज असल्यास ती १२४ असे ऐकून १६० किलोमीटर बाईक धावते असे अथर्व राजे याने सांगितले आहे.

ही बाईक अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. बाईकमुळे ७५ टक्के प्रदूषण कमी होईल असा दावा अथर्वने केला आहे. सध्याच्या दुचाकी या कमी अॅव्हरेज देतात त्यामुळे कालांतराने अधिकच त्या पेट्रोल खातात. त्याचा फटका नागरिक आणि पर्यावरणाला बसतो. याचा विचार करून संबंधित बाईक बनवल्याच अथर्व ने सांगितले. दरम्यान, गुजरात सरकार मार्फत एक्सेप्शनल इनोव्हेशन अवार्ड हा या बाईक मिळाला आहे. हायब्रीड बाईक च अनेक स्थरातून कौतुक झालं आहे. अथर्वने पेटंट फाईल केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri boy invented new bike which run 160 kms in 80 rupees only scj
First published on: 16-11-2019 at 13:20 IST