चिंचवड : चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना डावललं जात असल्याची चर्चा पिंपरी- चिंचवड शहरात रंगली होती. अखेर यावर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पडदा टाकला आहे. आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही. आम्ही पक्ष म्हणून एकत्र आहोत, पक्ष म्हटले की समज गैरसमज होत असतात, असं त्यांनी म्हटलं आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी गेल्या आठवड्यात भाजपच्या पत्रकार परिषदेत भाजप पदाधिकाऱ्याला पत्रकारांच्या समोर चांगलंच खडसावले होतं. त्यामुळे भाजपमध्ये विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना डावलं जात असल्याची चर्चा रंगली होती. अखेर यावर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : बांगलादेशातील बॉम्बस्फोट प्रकरणामधील आरोपीला पुण्यात अटक; दलालामार्फत पारपत्र मिळविल्याचे उघड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अश्विनी लक्ष्मण जगताप यांना गैरसमज झाला होता म्हणून त्यांच्याकडून काही शब्द अनावधानाने गेले होते. त्या पदाधिकाऱ्याने देखील काही शब्द काढला नाही, त्या वडीलधाऱ्या आहेत, पक्ष म्हटलं की समज-गैरसमज असतात. आम्ही सर्व एकत्र आहोत,असे शंकर जगताप म्हणाले. भाजपमध्ये निष्ठावंत नाराज नाहीत. उलट कार्यकारणीत निष्ठावंतांना सर्वात जास्त पदे देण्यात आली आहेत. परंतु, पक्ष संघटना म्हटलं की, नाराजी येते, त्यांची नाराजी दूर करण्याचा मी प्रयत्न करेल, असं देखील शंकर जगताप यांनी म्हटलं आहे. आमदारकी बाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असेही ते म्हणाले.