पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वैद्यकीय रजेवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात असणाऱ्या हॉटेल मालक आणि मॅनेजरशी हुज्जत घालत पैशांची मागणी केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. गंभीर बाब म्हणजे रजेवर असताना पोलीस गणवेशात जाऊन हॉटेल मालक आणि मॅनेजरशी हुज्जत घातली. मिलन कुरकुटे असं पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यकरत असलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची मान शरमेने खाली गेल्याची चर्चा पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, पैशांची मागणी करणारे पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे हे पोलीस आयुक्तालयात नियंत्रण कक्ष या ठिकाणी नेमणुकीस होते. मात्र २१ ऑगस्ट २०२१ पासून ते वैद्यकीय रजेवर होते. परंतु,  २४ ऑगस्ट २०२१ रोजी रजेवर असताना देखील पुणे पोलीस आयुक्तालयातील मुंढवा येथील हॉटेल कार्निव्हल येथे गणवेशात जाऊन हॉटेल मालक आणि मॅनेजरशी हुज्जत घालून पैशांची मागणी केली होती. याबाबतची माहिती मुंढवा पोलिसांना मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांना याची माहिती देण्यात आली. तेव्हा, संबंधित घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस खात्याची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे यांना निलंबित केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad corrupt police officer was suspended rmt 84 kjp
First published on: 25-08-2021 at 18:23 IST