पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर येथे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला आहे. रवी यलप्पा माने असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आज (शुक्रवार) सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पिंपळे सौदागर येथे लाईफ व्हीले नावाच्या इमारतीचे काम सुरु आहे. तिथे रवी माने (रा.पिंपळे सौदागर, सर्व्हे क्र. १५६) हा मजूर म्हणून काम करतो. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काम करत असताना तो खाली कोसळून तो गंभीर जखमी झाला. त्याला महापालिकेच्या यशवंत चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. इमारत मालकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची सांगवी पोलिसांत नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Mar 2017 रोजी प्रकाशित
पिंपरी चिंचवड: इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने मजुराचा मृत्यू
इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काम करत असताना तो खाली कोसळला.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 24-03-2017 at 14:39 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad man collapsed from third floor pimple saudagar