फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण ३२ प्रभागांमधील आरक्षणाची सोडत काढण्यात येत असून, प्रभागांची रचना आणि हद्द जाहीर करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक यंदा पहिल्यांदाच ४ सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची सदस्यसंख्या १२८ इतकी आहे. त्यानुसार चार सदस्यांचा एक प्रभाग या प्रमाणे ३२ प्रभाग होत आहेत. प्रभागातील जागांना १-अ, १-ब, १-क आणि १-ड असे संबोधण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण असल्यामुळे प्रत्येक प्रभागातील दोन जागा या महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. पिंपरी-चिंचवडमधील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अनुसूचित जातींसाठी २० जागा, अनुसूचित जमातींसाठी ३ जागा, नागरिकांचा मागासवर्गासाठी ३५ जागा आणि खुल्या गटासाठी ७० जागा असणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रभागांची प्रारुप रचना पुढीलप्रमाणे

प्रभाग क्रमांक १ – तळवडे आयटी पार्क, ज्योतिबानगर भाग, सोनवणेवस्ती, पाटीलनगर, चिखली गावठाण, गणेशनगर आणि मोरेवस्ती.
प्रभाग क्रमांक २ – चिखली गावठाणाचा काही भाग, कुदळवाडी, जाधववाडी, राजे शिवाजीनगर, मोशी बोऱ्हाडेवाडी.
प्रभाग क्रमांक ३ – मोशी गावठाण, डुडूळगांव, चोवीसावाडी, वडमुखवाडी, चऱ्होली, गंधर्वनगरी, संत ज्ञानेश्वरनगर.
प्रभाग क्रमांक ४ – दिघी, समर्थनगर, कृष्णानगर, बोपखेल, गणेशनगर.
प्रभाग क्रमांक ५ – गवळीनगर, रामनगरी, संत तुकारामनगर, ज्ञानेश्वरनगर, चक्रपाणी वसाहतीचा काही भाग.
प्रभाग क्रमांक ६ – सद्गुरूनगर, चक्रपाणी वसाहत भाग, धावडेवस्ती, भगतवस्ती.
प्रभाग क्रमांक ७ – सँडविक कॉलनी, भोसरी गावठाण, गव्हाणेवस्ती, खंडोबामाळ, शीतलबाग, लांडेवाडी, शांतीनगर.
प्रभाग क्रमांक ८ – केंद्रीय विहार, जय गणेश साम्राज्य, खंडेवस्ती, इंद्रायणीनगर, बालाजीनगर, गवळीमाथा.
प्रभाग क्रमांक ९ – अंतरिक्ष सोसायटी, विठ्ठलनगर, यशवंतनगर, नेहरूनगर, अजमेरा सोसायटी, मासूळकर कॉलनी, खराळवाडी, गांधीनगर.
प्रभाग क्रमांक १० – शाहूनगर, संभाजीनगर, एचडीएफसी कॉलनी, इंदिरानगर, दत्तनगर, विद्यानगर, लालटोपीनगर, अमृतेश्वर कॉलनी, म्हाडा कॉलनी, मोरवाडी.
प्रभाग क्रमांक ११ – कृष्णानगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, नेवाळेवस्ती, पूर्णानगर, शरदनगर, हरगुडेवस्ती, स्वस्त घरकुल योजना, अजंठानगर, दुर्गानगर.
प्रभाग क्रमांक १२ – रूपीनगर, त्रिवेणीनगर, सहयोगनगर, ताम्हाणेवस्तीचा काही भाग, म्हेत्रेवस्ती.
प्रभाग क्रमांक १३ – सेक्टर क्रमांक २२, यमुनानगर, निगडी गावठाण.
प्रभाग क्रमांक १४ – काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, आकुर्डी गावठाण, तुळजाईवस्ती, दत्तवाडी.
प्रभाग क्रमांक १५ – वाहतूकनगरी, सेक्टर क्रमांक २४, २६, २७, गंगानगर, प्राधिकरण.
प्रभाग क्रमांक १६ – मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत, गुरूद्वारा.
प्रभाग क्रमांक १७ – वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगर, दळवीनगर, भोईरनगर, प्रेमलोक पार्क.
प्रभाग क्रमांक १८ – पवनानगर, रस्टन कॉलनी, वेताळनगर, चिंचवड गावठाण, केशवनगर, लक्ष्मीनगर, तानाजीनगर, दर्शन हॉल.
प्रभाग क्रमांक १९ – उद्योनगर, क्वीन्स टाऊन, सुदर्शननगर, श्रीधरनगर, आनंदनगर, एम्पायर इस्टेट, भाटनगर, भाजी मंडई, दळवीनगर.
प्रभाग क्रमांक २० – संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर, महेशनगर, एच. ए. कॉलनी, विशाल थिएटर, कासारवाडी, कुंदननगर.
प्रभाग क्रमांक २१ – पिंपरीगाव, अशोक थिएटर, वैष्णवीदेवी मंदिर, मासूळकर पार्क, जिजामाता हॉस्पिटल, मिलिंदनगर.
प्रभाग क्रमांक २२ – विजयनगर, पवनानगर, नढेनगर, तापकीरनगरचा काही भाग, ज्योतिबानगर.
प्रभाग क्रमांक २३ – शिवतीर्थनगर, समर्थनगर, पडवळनगरचा भाग, सुंदर कॉलनी, साईनाथनगर, केशवनगर.
प्रभाग क्रमांक २४ – गणेशनगर, म्हातोबानगर, पद्मजी पेपर मिल, बिर्ला रुग्णालय, साई कॉलनी, पडवळनगर, महाराष्ट्र कॉलनी, गुजरनगर, बेलठिकानगर.
प्रभाग क्रमांक २५ – पुनावळे, ताथवडे, भूमकरवस्ती, वाकड, काळाखडक.
प्रभाग क्रमांक २६ – पिंपळेनिलख, कस्पटेवस्ती, अण्णाभाऊ साठेनगर, विशालनगर, वेणुनगर, वाकड-पिंपळेनिलख.
प्रभाग क्रमांक २७ – तापकीरनगर, श्रीनगर, बळीराम गार्डन, रहाटणी, तांबे शाळा, सिंहगड कॉलनी, लक्ष्मीबाई तापकीर शाळा, काळेवाडी फाटा, एमएम शाळा.
प्रभाग क्रमांक २८ – संपूर्ण पिंपळेसौदागर परिसर.
प्रभाग क्रमांक २९ – क्रांतीनगर, जवळकरनगर, शिवनेरी, गुलमोहर, ओंकार कॉलनी, गोकुळनगर, पिंपळेगुरव, सुदर्सननगर, वैदुवस्ती.
प्रभाग क्रमांक ३० – दापोडी, फुगेवाडी, कुंदननगर, सिद्धार्थनगर, कासारवाडी, सीएमई, मिलिटरी डेअरी फार्म.
प्रभाग क्रमांक ३१ – नवी सांगवी, किर्तीनगर, विनायकनगर, कवडेनगर, गांगर्डेनगर, गजानन महाराजनगर, विद्यानगर, औंध ऊरो रुग्णालय, राजीव गांधीनगर, साई चौक.
प्रभाग क्रमांक ३२ – सांगवी गावठाण, मधुबन सोसायटी, ढोरेनगर, जयमालानगर, पीडब्ल्यूडी कॉलनी, शिवदत्तनगर, कृष्णा चौक.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad municipal corporation election seats reservation draw 2016 updates
First published on: 07-10-2016 at 13:17 IST