टाळगाव चिखली येथे येत्या २८ सप्टेंबरला रिक्षांच्या सौंदर्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. पूर्वाश्रमीचे रिक्षाचालक असलेले माजी महापौर राहुल जाधव यांनी या स्पर्धांचे आयोजन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> लम्पी विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेची जनजागृती मोहीम

चिखली जाधववाडी येथील रामायण मैदानात २८ सप्टेंबरला दुपारी तीन वाजता या स्पर्धा होणार आहेत. राहुल जाधव स्पोर्टस फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील पहिल्या क्रमांकासाठी २१ हजार हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी १५ हजार रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी ११ हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. चिखली भागातील रिक्षाचालकांसाठी या स्पर्धा मर्यादित असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri muddy rickshaw beauty pageant pune print news amy
First published on: 21-09-2022 at 18:52 IST