पिंपरी : वाढत्या विरोधानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखली, कुदळवाडीतील नगररचना योजना रद्द केल्यानंतर आता चऱ्होलीतील प्रस्तावित नगररचना योजनेलाही (टीपी) स्थगिती दिली आहे.

सुनियोजित विकास करण्यासाठी महापालिकेने चऱ्होली येथील काही क्षेत्रावर नगररचना योजना राबवण्याचा इरादा १५ मे रोजी जाहीर केला होता. स्थानिकांनी, तसेच लोकप्रतिनिधींनी नगररचना योजना राबविण्यास विरोध दर्शविला होता. भाजप आमदार महेश लांडगे यांनी या योजनेला विरोध केला.

महापालिकेच्या प्रवेशद्वारासह चिखलीत तीव्र आंदोलन केले. शहराच्या स्थापनेपासून भूमिपुत्रांवर अन्याय झाला आहे. सुरुवातीला एमआयडीसी, त्यानंतर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आणि महापालिका हद्दीत समावेश झाल्यानंतरही विविध आरक्षणांसाठी शेतकऱ्यांची जमीन घेतली आहे. नगररचना योजनेच्या माध्यमातून शेतकरी भूमिहीन होतील. संपूर्ण शहराचा सुधारित विकास आराखडा (डीपी) तयार होत असताना नगररचना योजनेचा (टीपी) आग्रह कशासाठी, असा सवाल आमदार लांडगे यांनी उपस्थित केला होता. अखेरीस प्रशासनाने नगररचना योजनेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.

भूमिपुत्रांच्या हिताबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. चिखलीतील नगररचना योजना रद्द झाली आहे. चऱ्होलीतील योजनाही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन रद्द केली जाईल.- महेश लांडगे,आमदार, भोसरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चऱ्होली येथील काही क्षेत्रावर नगररचना योजना राबवण्याचा इरादा १५ मे रोजी जाहीर केला होता. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधींनी नगररचना योजना राबविण्यास विरोध दर्शविला होता. त्यामुळे नगररचना योजना तयार करण्यासंदर्भातील पुढील कार्यवाही स्थगित केली आहे. – शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका