पुण्यातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेतील पीएमपी बसच्या कोथरूड डेपोत उभ्या असलेल्या एका बसने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. अग्निशामकविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अग्निशामक आधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोथरूड डेपोत पार्किंगमध्ये असलेली एमएच १२ एचबी १०२० क्रमांकाच्या बसला बाहेर काढण्यापूर्वी तीने अचानक पेट घेतला. या आगीचे प्रमाण एवढे मोठे होते की, पूर्ण बस जळून खाक झाली. या बसच्या इंजिनच्या बाजूने आग लागल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

यामुळे पालिका प्रशासनाला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. मात्र, सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनीही याची तत्काळ दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. ही आग कशी लागली याची चौकशी पोलीस करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmp takes abdomen suddenly the whole bus was burnt down
First published on: 16-12-2017 at 14:56 IST