लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बारामती लोकसभा मतदार संघात आज मतदान सुरू आहे. त्यात सकाळी कमी प्रमाणात मतदान झाले. दुपारी १.३० वाजेपर्यंत २७.५५ टक्के, तर तीन वाजेपर्यंत ३४.९६ टक्के मतदान झाले. विशेषतः बारामती विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ४२.०५ टक्के, तर त्यापाठोपाठ भोर विधानसभा मतदासंघात ३८ टक्के मतदान झाले आहे.

आणखी वाचा-बारामती मतदारसंघासाठी मतदारांचा उन्हातही मतदानाला प्रतिसाद

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. उन्हाच्या झळांमुळे मतदानाच्या टक्क्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत १४.६४ टक्के मतदान झाले होते. दुपारी दीड वाजेपर्यंत म्हणजे दीड तासात २७.५५ टक्क्यांपर्यंत मतदान झाले, तर तीन वाजेपर्यंत ३४.९६ टक्के मतदान झाले.