scorecardresearch

पुणे : बिबवेवाडीतील इंदिरानगर आगारात पीएमपी बसला आग; प्रवासी नसल्याने अनर्थ टळला

अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली

पुणे : बिबवेवाडीतील इंदिरानगर आगारात पीएमपी बसला आग; प्रवासी नसल्याने अनर्थ टळला

बिबवेवाडीतील इंदिरानगर बस डेपोच्या आवारात पीएमपी बसला अचानक आग लागली. बसमध्ये प्रवासी नसल्याने अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोेक्यात आणली. अप्पर  इंदिरानगर बसडेपोच्या आवारात लावण्यात आलेल्या बसमधील इंजिनाने अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख सुनील नाईकनवरे, निलेश कदम, जवान जितेंद्र कुंभार, निलेश कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा >>> पुणे- लोणावळा रेल्वे रुळावरील स्टंटबाजी पडली महागात…!; तरुणांना रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दरम्यान, बसचालक विश्वास किलजे यांनी स्थानकातील अग्निरोधक उपकरणांचा वापर करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. बसमध्ये प्रवासी नव्हते. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2022 at 22:03 IST

संबंधित बातम्या