पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा मंगळवारी स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली. पंतप्रधानाच्या आगमनानिमित्त पोलिसांनी सोमवारी सायंकाळी बंदोबस्ताची रंगीत तालीम घेतली. जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आल्याने मध्यभागात वाहतूक कोंडी झाली. रस्ते वाहतुकीस खुले करण्यात आल्यानंतर कोंडी कमी झाली.

पंतप्रधान मोदी यांच्या आगमनानिमित्त शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे. त्या मार्गावर सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी बंदोबस्ताची रंगीत तालीम घेतली. जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. या रस्त्यांना जोडणारे उपरस्ते बंद करण्यात आले. त्यामुळे कार्यालयातून घरी परतणाऱ्या नागरिक कोंडीत अडकले.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरे यांच्या बॅग चेक प्रकरणावर सुप्रिया सुळे यांच मोठ विधान…..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जंगली महाराज रस्ता, घोले रस्ता, आपटे रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली, तसेच टिळक रस्ता, सदाशिव पेठ, शास्त्री रस्ता परिसरात कोंडी झाली. पोलिसांनी रंगीत तालिमीसाठी पोलिसांनी पंधरा ते वीस मिनिटे रस्ते बंद केले. रस्ते बंद केल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. कार्यालयीन कामकाज आटोपून बाहेर पडलेल्या नागरिकांची गैरसोय झाली.