पुणे: एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात पिस्तुलाच्या धाकाने मद्यविक्री दरोडा घालणाऱ्या चार अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदारास अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून पिस्तूल, तलवार आणि ३२ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

तेजस राहुल पिंपळगावकर (वय १९, रा. माणिकबाग, सिंहगड रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी चार अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले असून, अल्पवयीन मुलांविरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत मनोज बाळासाहेब मोरे (वय ३३, रा. कृष्णा रेसीडन्सी, कोंढवे धावडे) यांनी फिर्याद दिली होती.

Pune, Father to Kill Son, Construction developer s Murder Attempt , Family Feud, crime in pune, pune murder planning, pune news, marathi news, murder plan in pune, firing in pune,
पुणे : कौटुंबिक वादातून वडिलांनीच दिली मुलाची सुपारी, जंगली महाराज रस्त्यावरील गोळीबाराचा उलगडा
Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
pune immoral relationship marathi news
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या तरुणाचा मोटारीखाली चिरडून खून; महिलेसह दोघांना अटक
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा

हेही वाचा… जागतिक साखर उत्पादनात ३५ लाख टन घट; जागतिक अन्न संघटनेचा अंदाज

एनडीए रस्त्यावर उत्तमनगर परिसरात आर. आर. वाईन्स मद्य विक्रीचे दुकान आहे. रविवारी (१९ नोव्हेंबर) रात्री विश्वचषकातील अंतिम सामना सुरू होता. मद्य विक्री दुकानात गर्दी होती. त्यावेळी दुचाकीवरुन पाच जण आले. त्यांच्याकडे पिस्तूल, कोयता, तलवारी अशी शस्त्रे होती. चोरटे मद्य विक्री दुकानात शिरले. पिस्तूल, तसेच तलवार, कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील रोकड काढून घेतली. दुकानातील मद्याच्या बाटल्या पिशवीत भरल्या. दुकानातील कामगार आणि ग्राहकांना जीवे मारण्याची धमकी देऊन चोरटे भरधाव वेगााने दुचाकीवरुन पसार झाले.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींच्या शोधासाठी उत्तमनगर, सिंहगड रस्ता पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते. तांत्रिक तपासावरून पोलिसांनी सिंहगड रस्त्त्यावरील माणिकबाग भागातून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्तुलासह रोकड जप्त करण्यात आली आहे. सहायक पोलीस आयुक्त भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, सहायक निरीक्षक दादाराजे पवार, उमेश रोकडे, समीर पवार, तुषार किंद्रे आदींनी ही कामगिरी केली.