पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याची शुक्रवारी रंगीत तालीम घेण्यात आली. पंतप्रधान मोदी लोहगाव विमानतळावरून ज्या ठिकाणी हेलिकॉप्टरने जाणार आहेत, त्या ठिकाणी प्रत्यक्ष हेलिकॉप्टर उतरविण्यात आले. तसेच ऐन वेळी हेलिकॉप्टरने प्रवास टाळल्यास रस्त्याने जाण्याच्या ठिकाणापर्यंतची आणि पुणे मेट्रोतून प्रवास करणाऱ्या मार्गावर मेट्रोची रंगीत तालीम घेण्यात आली. केंद्रीय सुरक्षा पथक, पुणे पोलीस, जिल्हा प्रशासन, पुणे मेट्रो आणि संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी या वेळी उपस्थित होते,

पंतप्रधान मोदी यांचे सकाळी ११ वाजता लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने कृषी महाविद्यालय येथे येतील. तेथून पुणे महापालिका भवन येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळय़ाचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी महापालिकेतून कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय येथे पुणे मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन आणि मेट्रोने आनंदनगपर्यंतचा प्रवास करणार आहेत. त्यानंतर एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर मोदी यांची जाहीर सभा होणार असून त्यानंतर ते हेलिकॉप्टरने लवळे येथील सिम्बायोसिस महाविद्यालयाला भेट देणार आहेत. दुपारी दोन वाजता पंतप्रधान मोदी दिल्लीकडे रवाना होणार आहेत. याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले,  करोना चाचणी नकारात्मक येणाऱ्या अधिकाऱ्यांनाच रविवारी   पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात सहभागी होता येईल.   सुरक्षेच्या कारणास्तव शनिवार आणि रविवारी दोन दिवस पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात पॅराग्लायिडग, हॉट बलून अशा प्रकारच्या अवकाश उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे.

Narendra Modi and Raj Thackeray Meeting in Kalyan
कल्याणमध्ये नरेंद्र मोदी, राज ठाकरे यांच्या सभा
Hearing on Arvind Kejriwal petition today
केजरीवाल यांच्या याचिकेवर आज सुनावणी
Pm narendra modi, race course,
पुणे : साडेचार दशकांनंतर रेसकोर्सवर पंतप्रधानांची सभा, भाजपतर्फे नियोजन सुरू, पोलिसांकडूनही स्थळाची पाहणी
yavatmal, ralegaon, Unknown Assailant , Pelts Stone, Uday Samant, Pelts Stone at Uday Samant's Convoy, Uday Samant s Convoy Vehicle , Campaign Meeting, Pelts stone Uday Samant s Convoy Vehicle,
मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील वाहनावर दगड भिरकावला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यानची घटना

२०० अधिकारी पुण्यात तळ ठोकून

पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा व्यवस्थेतील २०० अधिकारी पुण्यात ठाण मांडून आहेत. या अधिकाऱ्यांकडून पंतप्रधान मोदी भेट देणाऱ्या ठिकाणांची कसून तपासणी करण्यात येत आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कार्यक्रमांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.