scorecardresearch

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी; पुण्यात संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तात वाढ

शहरातील कायदा-सुव्यवस्था अबधित ठेवण्यासाठी संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी; पुण्यात संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तात वाढ
(संग्रहित छायाचित्र)

पुणे : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर बंदी घालण्यात आल्यानंतर कोंढवा भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्था अबधित ठेवण्यासाठी संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

‘पीएफआय”संघटनेच्या कोंढवा भागातील कार्यालयावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गेल्या गुरुवारी (२२ सप्टेंबर) छापा टाकला. एनआयएच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. एनआयएच्या पथकाने पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागात कारवाई केली. ‘पीएफआय’वर केंद्रशासनाने पाच वर्षांची बंदी घालण्यात आल्यानंतर शहरातील संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कोंढवा भागातील बंदोबस्तात ठेवण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या