पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील बाधित दर ४.२ टक्क्यांनी अधिक

३१ ते ४० वयोगटातील २६ टक्के  बाधित; मृत्युदर मात्र ०.९ टक्क्यांनी कमी

३१ ते ४० वयोगटातील २६ टक्के  बाधित; मृत्युदर मात्र ०.९ टक्क्यांनी कमी

पुणे : करोना संसर्गाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत शहरासह जिल्ह्य़ातील नागरिक बाधित होण्याचे प्रमाण ४.२ टक्क्यांनी जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. पहिल्या लाटेत बाधित होण्याचा दर १९.४ टक्के , तर दुसऱ्या लाटेत हाच दर २३.६ टक्के  एवढा होता. तसेच ३१ ते ४० वयोगटातील तब्बल २६ टक्के  नागरिक दुसऱ्या लाटेत बाधित झाले असून मृत्युदर मात्र पहिल्या लाटेच्या तुलनेत ०.९ टक्क्यांनी कमी झाला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांमधील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. उर्वरित ग्रामीण भागातील रुग्णसंख्याही कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही आकडेवारी जाहीर के ली आहे. त्यानुसार पहिल्या लाटेत १६ लाख ३१ हजार १२९ आरटीपीसीआर आणि प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या, त्यामध्ये एक लाख १३ हजार ७१७ नागरिक बाधित झाले. पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्णसंख्या एकाच दिवशी ४९३५ एवढी आढळून आली. २९ सप्टेंबर रोजी शहरासह जिल्ह्य़ात सर्वाधिक ४२ हजार ९४६ सक्रिय रुग्णसंख्या होती. यामध्ये ३१ ते ४० वयोगटातील २४ टक्के  नागरिक बाधित झाले होते, तर एकू ण मृत्यू ८८१८ होऊन मृत्युदर २.४ टक्के  एवढा होता. ६१ ते ७० वयोगटातील सर्वाधिक १३०२ नागरिक मृत्युमुखी पडले. या काळात प्रतिबंधात्मक क्षेत्रे २०५ एवढी होती.

दरम्यान, दुसऱ्या लाटेत ११ लाख ७९ हजार २४९ दोन्ही प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या, त्यामध्ये दोन लाख ८९ हजार ८५४ नागरिक बाधित झाले. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्णसंख्या एप्रिल महिन्यात एकाच दिवशी १२ हजार ८३६ एवढी आढळून आली. १८ एप्रिल रोजी शहरासह जिल्ह्य़ात सर्वाधिक एक लाख तीन हजार ६२० सक्रिय रुग्णसंख्या होती. यामध्ये ३१ ते ४० वयोगटातील २६ टक्के  नागरिक बाधित झाले होते, तर एकू ण मृत्यू ६४८८ होऊन मृत्युदर १.५ टक्के  एवढा होता.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील उपचार सुविधा

प्रकार                                                            पहिली लाट             दुसरी लाट

करोना काळजी के ंद्र                                          १०६                         ९७

एकू ण उपलब्ध खाटा                                         २१,०८८                  ५७,४२६

समर्पित करोना रुग्णालय (डीसीएचसी)                   १८२                           ५८१

(डीसीएचसी) उपलब्ध खाटा                                  ६३४१                    १५,६८६

समर्पित करोना रुग्णालय (डीसीएच)                      ६६                            १२०

(डीसीएच) उपलब्ध खाटा                                    ८१०६                        ९१७८

प्राणवायू खाटा                                                   ५६००                     १६,७९९

व्हेंटिलेटर्स उपलब्धता                                        ९०५                          १८१५

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Positive rate in covid 19 second wave over 4 percent higher compared to the first wave zws

Next Story
राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी काकडे, निकम, पाटील यांची चर्चा
ताज्या बातम्या