आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे ‘कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्र आता श्राव्य (ऑडिओ) माध्यमाद्वारे रसिकांच्या भेटीला येत आहे. मुंबईच्या ‘एनसीपीए’ (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्स) सभागृह येथे २३ मार्च रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या सीडींचे प्रकाशन होणार आहे.
संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून राज्य मराठी विकास संस्थेने ‘कृष्णाकाठ’ श्राव्य माध्यमातून आणण्याचा संकल्प पूर्ण केला आहे. संस्थेचे संचालक डॉ. अशोक सोलनकर, राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सचिव प्रमोद नलावडे यांनी या प्रकल्पासाठी प्रकाश पायगुडे यांच्याशी संपर्क साधला. टिळक रस्त्यावरील स्टुडिओ एकलॉम येथे १ जानेवारी ते ३१ जानेवारी या अवघ्या एक महिन्यात हे आत्मचरित्र श्राव्य माध्यमासाठी ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे.
याविषयी माहिती देताना प्रकाश पायगुडे म्हणाले, यशवंतरावांचे हे आत्मचरित्र तीन भागांमध्ये आहे. ‘जडणघडण’ या पहिल्या भागाचे अभिवाचन किरण यज्ञोपवीत यांनी केले आहे. ‘वैचारिक आंदोलने’ या दुसऱ्या भागाचे शशांक शेंडे यांनी, तर ‘निवड’ या राजकीय भागाचे अभिवाचन अभिनेते सचिन खेडेकर यांनी केले आहे. यशवंतरावांच्या राजकीय कालखंडाचे साक्षीदार असलेले माजी आमदार उल्हास पवार यांनी प्रत्येक भागाचे निरूपण केले आहे. ११ तास ९ मिनिटे या कालावधीचे ध्वनिमुद्रण झाले आहे. राज्य मराठी विकास परिषदेच्या संकेतस्थळावरून ‘कृष्णाकाठ’चे अभिवाचन डाऊनलोड करता येणार आहे. त्याचप्रमाणे यू-टय़ूबवरदेखील हे आत्मचिरत्र तुकडय़ा तुकडय़ाने ऐकता येईल.
संग्रहित लेख, दिनांक 13th Mar 2013 रोजी प्रकाशित
यशवंतरावांचे ‘कृष्णाकाठ’ आता श्राव्य माध्यमात
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे ‘कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्र आता श्राव्य (ऑडिओ) माध्यमाद्वारे रसिकांच्या भेटीला येत आहे. मुंबईच्या ‘एनसीपीए’ (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्स) सभागृह येथे २३ मार्च रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या सीडींचे प्रकाशन होणार आहे.

First published on: 13-03-2013 at 01:59 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President of india will publish krishnakath on 23rd march