लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: साहित्यिक पुस्तकांची पायरसी होण्याचे प्रकार आजवर अनेकदा उघडकीस आले आहेत. मात्र आता राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) तयार केलेल्या शालेय अभ्यासक्रमांच्या पुस्तकांना पायरसीची वाळवी लागल्याचे समोर आले आहे. एनसीईआरटीच्या संकेतस्थळावरील उपलब्ध पुस्तके खासगी प्रकाशकांनी एनसीईआरटीची परवानगी न घेता पाठ्यपुस्तकांची छपाई केल्याचे निदर्शनास आले आहे. पालक, विद्यार्थ्यांनी अशा बनावट पुस्तकांपासून दूर राहण्याचे आवाहन एनसीईआरटीकडून करण्यात आले आहे.

Maharashtra News in Marathi
Maharashtra News : नाना पटोलेंच्या अपघातामागे संजय राऊतांचा हात? संजय शिरसाटांचा गंभीर आरोप, म्हणाले…
Kiritkumar Shinde Resigns From MNS
कीर्तिकुमार शिंदेंचा मनसेला अलविदा! पोस्ट शेअर करत म्हणाले, “राज ठाकरेंच्या अनाकलनीय भूमिकांचं..”
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”

एनसीईआरटीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एनसीईआरटी ही शालेय शिक्षणाबाबत केंद्र सरकारला सल्ला देणारी संस्था आहे. सर्व इयत्तांच्या शैक्षणिक अध्ययन आणि अध्यापनासाठी अभ्यासक्रम निर्मिती, पुस्तकांच्या वितरणाचे काम या संस्थेमार्फत केले जाते. एनसीईआरटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली पुस्तके काही खासगी प्रकाशकांनी परवानगी न घेता स्वतःच्या नावाने प्रकाशित केल्याचे निदर्शनास आले आहे. कोणीही व्यक्ती किंवा संस्थेने व्यावसायिक कारणासाठी एनसीईआरटीची पुस्तके किंवा पुस्तकातील काही भाग विनापरवनागी वापरल्यास कॉपीराइट कायदा १९५७चे उल्लंघन होते, असे एनसीईआरटीने नमूद केले आहे.

आणखी वाचा-रेल्वे प्रवाशांचा मतदानावर बहिष्कार! पुणे-दौंड उपनगरी सेवा सुरू होत नसल्याने पाऊल

‘पायरसी’ केलेल्या पाठ्यपुस्तकांतील आशयात चुका असू शकतात, तसेच ते राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२३च्या मुलभूत तत्त्वाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे अशा पुस्तकांपासून दूर राहावे. पाठ्यपुस्तके, कृतिपुस्तकांची पायरसी करणारी व्यक्ती निदर्शनास आल्यास त्याबाबतची माहिती pd.ncert@nic.in या इमेलद्वारे कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.