बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता यांचे सर्व अधिकार काढून घेतल्याच्या निषेध नोंदवत बँकेच्या शिवाजीनगर येथील लोकमंगल या मुख्य कार्यालयासमोर सर्व कर्मचायांनी काळ्या फिती बांधून आंदोलन केले.

गुंतवणूकदाराच्या फसवणुकीप्रकरणी डीएसके मागील तीन महिन्यापासून अटकेत आहेत. डीएसके यांना कर्ज देताना नियमांना धाब्यावर बसवल्याप्रकरणी प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यासह चार आधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. अटक केली होती.त्या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने रवींद्र मराठे यांना जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यानंतर काही तासातच बँकेने त्यांचे अधिकार काढून घेतले. याचाच निषेध करत कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले.

या पार्श्वभूमीवर आज शिवाजीनगर येथील बँक महाराष्ट्र च्या मुख्य कार्यालया बाहेर कर्मचारी वर्गाने काळ्या फिती बांधून रवींद्र मराठे यांच्यावरील कारवाई चा निषेध व्यक्त केला. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी विराज टिकेकर म्हणाले की,रवींद्र मराठे यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई अत्यंत चुकीची असून त्यांना न्यायालयाने जामीन दिला.मात्र त्या घटनेला काही तास होत नाही. तोवर त्यांच्याकडील सर्व अधिकारी काढून घेतल्याने ही अन्यायकारक बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तर रवींद्र मराठे यांना पुन्हा सर्व अधिकार द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.त्याचबरोबर आम्ही आठवडाभर निषेध नोंदवणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली.