सासवड रस्त्यावरील गोदामाची भिंत फोडून मद्याच्या बाटल्यांची खोकी चोरुन पसार झालेल्या चोरट्यांच्या टोळीला उस्मानाबाद परिसरातून हडपसर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून दहा लाखांच्या मद्याच्या बाटल्यांची खोकी तसेच ट्रक असा ४९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटकेत

nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
traffic police action against goon nilesh ghaiwal
गुंड नीलेश घायवळला वाहतूक शाखेचा दणका, मोटारींना काळ्या रंगाच्या काचांचा वापर केल्याप्रकरणी दंड
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल

आतिश ऊर्फ पिल्या विश्वनाथ बोंदर ( वय २६, रा. उकडगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) , सागर ऊर्फ दाद्या शिवाजी मस्तुद (वय २८, रा. पांगरी, ता. बार्शी, जि. सोलापूर), तानाजी भागवत चौघुले (वय ३८,, रा. पारडी ता. बार्शी, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सासवड रस्त्यावरील फुरसुंगी परिसरात श्रीनाथ वेअर हाऊसची भिंत फोडून चोरट्यांनी मद्याच्या बाटल्या लांबविल्या होत्या. चोरट्यांनी गोदामाच्या भिंतीजवळ ट्रक लावून भिंत फोडली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते.

चोरट्यांच्या टोळीच्या म्होरक्याचा शोध सुरू –

फुरसुंगी, लोणी काळभोर, पाटस परिसरातील टोलनाक्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी पडताळले. पोलिसांनी २५० ठिकाणचे चित्रीकरण ताब्यात घेतल्यानंतर चोरटे उस्मानाबाद परिसरात असल्याची माहिती निष्पन्न झाली.त्यानंतर पोलिसांनी उस्मानाबद जिल्ह्यातील कळंब, कन्हेरगाव, पांगरी, तेरखेडा, पारडी परिसरातील गावात चौकशी सुरू केली. चौकशीत चोरटा विभीषण काळेने साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून चोरट्यांना पकडले. चोरट्यांच्या टोळीच्या म्होरक्या काळेचा शोध सुरू आहे. त्याच्या विरोधात नऊ गुन्हे दाखल आहेत.

पोलीस उपायुक्त पाटील, सहायक आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक दिगंगर शिंदे, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, सुशील लोणकर, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, सूरज कुंभार, अतुल पंधरकर, अनिरुद्ध पंधरकर आदींनी ही कारवाई केली.