पुण्यातील विमान प्रवास करणार्‍या प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. कारण पुणे विमानतळ १६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान धावपट्टीच्या कामासाठी बंद राहणार आहे, अशी माहिती पुणे विमानतळाचे संचालक संतोष डोके यांनी दिली. 

पुणे शहरातील लोहगाव येथील हवाई दलाच्या एअर बेसवरुनच व्यावसायिक विमानांचे नियंत्रण केले जाते. विमानतळाच्या अंतर्गत कामानिमित्त सप्टेंबर २०२० पासून रात्रीचे उड्डाण आणि लँडिंग बंद होते. विमानतळावर रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. यावेळी रात्रीच्या सर्व प्रकारची विमान उड्डाणं आणि लँडिंगच्या सुविधा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे जवळपास वर्षभर लोहगाववरून केवळ दिवसाच उड्डाणे होत आहेत. आता ते देखील बंद होणार आहेत. आता १६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान धावपट्टीचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे पंधरा दिवसांकरीता प्रवाशांना सेवा बंद राहणार आहे. 

mumbai airport, five crore passengers mumbai airport
मुंबई विमानतळावरून ५ कोटी प्रवाशांचा प्रवास
pune airport marathi news
पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल कधी सुरु होणार? विमानतळाच्या संचालकांनी दिलं उत्तर…
Mumbai flight canceled due to off runway lights at Nagpur airport
नागपूर: धावपट्टीवर अंधार, मुंबई विमान रद्द
Delhi airport nuclear bomb threat
अणूबॉम्बने विमानतळ उडवून देण्याची धमकी, गुजरातच्या दोघांना दिल्लीत अटक

१६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान बुकींग केलेल्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे. प्रवाशांना बुकींग रद्द करावं लागणार आहे.