आयसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय असलेल्या मुंबईतील तीन तरूणांपैकी एका तरूणाला मंगळवारी रात्री पुण्यात दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी मुंबईतील मालवणी येथील तीन तरुण आयसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. अयाज सुलतान(२३), मोहसीन शेख(२६) आणि वाजिद शेख(२५) अशी या तरुणांची नावे होती. यापैकी अयाज सुलतानला थोड्याचवेळापूर्वी पुणे एटीएसने ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Dec 2015 रोजी प्रकाशित
मालवणीतील बेपत्ता तरूणांपैकी एकजण पुणे एटीएसच्या ताब्यात
काही दिवसांपूर्वी मुंबईतील मालवणी येथील तीन तरुण आयसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता
Written by रोहित धामणस्कर
First published on: 22-12-2015 at 22:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune ats arrest one suspect from mumbai who left to join isis