पुण्यातील मावळमध्ये इंद्रायणी नदीच्या पुलावरून कार थेट नदी पात्रात पडल्याची घटना समोर आली आहे. यावेळी गाडीतील दोघे जण बुडाले असून एक जण पोहत बाहेर आल्याने वाचला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना आज दुपारी एक वाजता घडली. घटनास्थळी वडगाव पोलीस आणि स्थानिक नागरिक दाखल झाले होते. नंदु असवले (चालक) आणि अक्षय जगताप अशी मृतांची नावे आहेत. तर अक्षय ढगेचा जीव वाचला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “कान्हे फाटा येथून टाकावे गावाकडे जाताना इंद्रायणी नदी लागते. याच नदीवरील पुलावर खड्डे असून तो खड्डा चुकवताना मोटार लोखंडी ग्रील तोडून नदी पात्रात पडली”. मोटारीत एकूण तिघेजण होते. यापैकी एक जण पोहत बाहेर आल्याने वाचला अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. बुडालेल्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक व शिवदुर्ग टीम प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, गुरुवारी रात्री उशीरा टाकवे पुलावर इंद्रायणी नदीमध्ये बुडालेली स्विफ्ट डिझायर कार एनडीआरएफ व शिवदुर्ग टीमच्या मदतीने नदीबाहेर काढण्यात यश आले. या कारमध्ये संकेत नंदू असवले (रा. टाकवे) याचा मृतदेह सापडला असून अक्षय मनोहर जगताप याचा अद्याप शोध घेतला जात आहे. काल रात्री अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते.