राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे चर्चेत राहतात… तशीच त्यांच्या आणखी एका गोष्टींची चर्चा असते, ती म्हणजे वक्तशीरपणा! अजित पवारांच्या कार्यालयीन कामाला सकाळपासूनच सुरूवात होते. त्यामुळे जिथे कुठे कार्यक्रम असेल, तिथल्या अधिकाऱ्यांची धांदल उडते. असाच प्रसंग पुण्यात अनुभवायला मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात करोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यातही करोनाच्या नवीन प्रकाराची भीती व्यक्त केली जात आहे. पुण्यात पुन्हा करोना बळावणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जात असून, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती.

ही बैठक सकाळी नऊ वाजता सुरू होणार होती. त्यामुळे त्या हिशोबाने बैठकीची तयारी सुरू होती. पण उपमुख्यमंत्री अजित पवार हे आठ वाजताच अचानक बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले. उपमुख्यमंत्री आधीच दाखल झाल्याचं कळाल्यानंतर प्रशासनाची धांदल उडाली. अजित पवार हे साधारण तासभर अगोदर आल्याने, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांची एकच धावपळ झाल्याची दिसून आलं.

“शरद पवारांमुळे पहाटे उठण्याची सवय लागली”

अजित पवार हे पहाटे लवकर उठून त्यांच्या दैनंदिन कामाला सुरूवात करतात. त्यांच्या पहाटे उठवण्याच्या सवयीबद्दल त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. “सकाळी लवकर उठण्याची सवय आजोबांची नाही तर चुलत्याची (शरद पवार) लागली आहे. आम्ही जसं बघतोय तसं चुलते २७ वर्षांचे असताना सकाळी सातला कामाला लागायचे. रात्री दोनला आले, तरी सकाळी सातला काम सुरूच. आता वय वर्ष 80 पूर्ण झालं, तरी देखील आजही सकाळपासून कसं साहेब काम करत असतात, हे आपण पाहतो. शेवटी तुमच्यावर कसे संस्कार होतात त्यावर अवलंबून असतं. सकाळी कामाला सुरुवात केली तर वातावरण देखील स्वछ असतं. एक, उत्साह असतो,” असं अजित पवार म्हणाले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune coronavirus update ajit pawar came early at meeting place bmh 90 svk
First published on: 21-02-2021 at 10:11 IST