स्वतःच्याच तीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या पित्याला पुणे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि १४ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. नवऱ्याची ही क्रूरता माहिती असूनही, त्याला पाठीशी घालणाऱ्या महिलेला सात वर्ष सक्त मजूरी आणि पाच हजारांची शिक्षा सुनावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बलात्काराच्या घटना २०१० ते २२ एप्रिल २०१५ या कालावधीत घडल्या आहेत. आरोपी पित्याने २२, १९ आणि १५ वर्षांच्या स्वतच्याच तीन मुलींवर बलात्कार केला. याबाबत कोणाला न सांगण्याची धमकी त्याने दिली होती. मात्र, १५ वर्षीय मुलीने याबाबत ओळखीच्या महिलेला सांगितले होते. त्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत माहिती दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता.

शिक्षा झालेला आरोपी पिता ४५, तर माता ४० वर्षांची आहे. हे कुटुंबीय कोंढवा भागात राहत असून, मूळचे उत्तर प्रदेशातील आहे. विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोणे यांनी गुरूवारी हा निकाल दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune court rape case crime
First published on: 01-02-2019 at 17:15 IST