वनाज ते आयडियल कॉलनी दरम्यान मेट्रोची धाव

पुणे : वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिके अंतर्गत वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यात मेट्रोची चाचणी शुक्रवारी होणार आहे. तीन डब्यांच्या दोन मेट्रो रेल्वेद्वारे ३.५ किलोमीटर अंतरात ही चाचणी होईल. मेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसांपूर्वी सरावपूर्व चाचणी घेण्यात आली होती. चाचणीनंतर ऑक्टोबर अखेपर्यंत मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्याचे महामेट्रोच्या विचाराधीन आहे. ही चाचणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिके अंतर्गत वनाज ते गरवारे महाविद्यालय या मेट्रो मार्गिके ची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. एकू ण पाच किलोमीटर लांबीचा हा टप्पा आहे. या मार्गावर मेट्रोने सरावपूर्व चाचणी घेतली होती. ही मार्गिका उन्नत असून रूळ टाकण्यासह विद्युत तारांची कामे पूर्ण झाली असून मार्गिके अंतर्गत काही मेट्रो स्थानकांची कामेही पूर्ण झालेली आहेत.

महापालिके ची निवडणूक फे ब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ऑगस्ट अखेपर्यंत वनाज ते रामवाडी या मार्गिके चा काही भाग सुरू करण्याचा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा आग्रह आहे. टाळेबंदी असतानाही महामेट्रोने या मार्गावरील कामे वेगाने सुरू ठेवली होती. वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिके वर मेट्रो धावण्याची चाचणी घेण्यासही प्राधान्य देण्यात आले होते. यापूर्वी पिंपरी चिंचवडमधे महामेट्रोने मेट्रोची यशस्वी चाचणी घेतली होती. ही चाचणी घेतल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील काही टप्प्यातील मेट्रो मार्ग प्रवासी सेवेसाठी सुरू करण्याचे विचाराधीन आहे.

कोथरूड येथील कचरा भूमीच्या जागेत महामेट्रोने पार्किं ग आणि देखभाल दुरुस्तीसाठी कार शेड उभारले जात आहे. त्याला हिल व्ह्य़ू पार्क कार शेड असे नाव देण्यात आले आहे.

त्याचे कामही महामेट्रोकडून युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी मेट्रोच्या तीन डबे असलेल्या दोन मेट्रो रेल्वे ठेवण्यात आल्या आहेत. या दोन मेट्रोच्या साहाय्याने ही चाचणी घेतली जाणार आहे. मेट्रोचे डबे इटलीतील कारखान्यात तयार करण्यात आले आहेत. विशिष्ट धातूपासून हे डबे तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन मेट्रो मार्गिकांची कामे सुरू आहेत. या दोन्ही मार्गिकांची एकू ण लांबी ३२ किलोमीटर एवढी आहे. यातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट ही मेट्रो मार्गिका शेतकी महाविद्यालयापर्यंत उन्नत आणि तेथून पुढे स्वारगेट पर्यंत भूमिगत आहे. भूमिगत मेट्रो मार्गिके चे कामही वेगात सुरू आहे. भूमिगत मेट्रो मार्गिके साठी बोगदा निर्मितीचे काम कृषी महाविद्यालयापासून कसबा पेठेपर्यंत पोहोचले आहे. स्वारगटेपासून कसबा पेठेपर्यंतचे कामही सुरू झाले आहे. नदीपात्राखालूनही महामेट्रोने भूमिगत मार्गिके साठी बोगदा निर्मिती करण्याचा आव्हानात्मक टप्पा पूर्ण के ला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune metro trial run between vanaj to ideal colony zws
First published on: 30-07-2021 at 03:02 IST