तळजाई भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले.

या प्रकरणी टोळीप्रमुख सोनू उर्फ आनंद सिद्धेश्वर धडे (वय २२), प्रेम गणेश चांदणे (वय २३), नागेश सतीश शिंदे (वय १८), मंगल्या उर्फ मंगल बाबासाहेब भिसे (वय २३, सर्व रा. तळजाई वसाहत, पद्मावती) यांच्या विरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. धडे, चांदणे, शिंदे, भिसे तसेच त्यांच्या टोळीतील अल्पवयीन मुलांच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न, लूट, मारहाण, खुनाचा कट असे गंभीर स्वरुपाचे १२ गुन्हे सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

mumbai, Brother Killed, Jogeshwari East, House Redevelopment Dispute, murder case, murder in jogeshwari, murder in mumbai, crime news, crime in mumbbai, crime in jogeshwari, marathi news,
पुनर्विकासाच्या वादातून जोगेश्वरी येथे भावाची हत्या, आरोपीला मेघवारी पोलिसांकडून अटक
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
pleas challenging maratha quota in bombay hc
मराठा आरक्षण : प्रवेश, नोकऱ्यांवर टांगती तलवार; नियुक्त्या अंतिम निर्णयाच्या अधीन – उच्च न्यायालय
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश

सहा महिन्यात शहरातील २५ गुंड टोळ्यांच्या विरोधात मोक्का कारवाई –

या टोळीने स्वारगेट, कोंढवा, सहकारनगर भागात गुन्हे केले होते. त्यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळराम साळगावकर यांनी तयार केला. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त सागर पाटील तसेच अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी देण्यात आली. गेल्या सहा महिन्यात शहरातील २५ गुंड टोळ्यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.