पुणे : पैशांसाठी अल्पवयीन मुलांकडून परप्रांतिय कामगाराची हत्या; ८० पेक्षा अधिक CCTVच्या तपासानंतर आरोपींना अटक

हत्या झालेल्या कामगारावर पाच जणांच्या पालन पोषणाची जबाबदारी होती

Pune Murder of youth

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये (एमआयडीसी) मध्ये कामगार तरुणाचा खून केल्याचं उघड झाल आहे. पिंटूकुमार सहदेव शहा (२९) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. पिंटूकुमार हा वेल्डिंग करण्याचं काम करत होता. याप्रकरणी दरोडा विरोधी पथकाने अभिषेक चंद्रकांत नलावडे उर्फ एनएन (१९) या आरोपीला अटक केली असून इतर चार अल्पयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. 

रात्री अकराच्या सुमारास पिंटूकुमार हा सायकलवरून एमआयडीसी परिसरातून जात होता. तेव्हा, आरोपींनी त्याच्याकडे पैशांची आणि मोबाईलची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने पिंटूकुमारच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आरोपी अभिषेक आणि इतर चार अल्पवयीन आरोपींनी हॉटेलमध्ये एकत्र जेवण केले होते. मात्र, आणखी मजा करण्यासाठी त्यांना पैसे हवे होते. त्यांनी भोसरी एमआयडीसी परिसरातील गुळवे वस्ती येथे रात्री उशिरा कामावरून घरी जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांची लुट करण्याची योजना आखली. त्यानुसार, रात्री अकराच्या सुमारास गुळवे वस्ती येथे थांबून त्यांनी अगोदर एका दुचाकीस्वाराला अडवत अरेरावी करत त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकीस्वाराने त्यांना चकवा देत तेथून पळ काढला. मात्र आरोपींनी त्याचा दुचाकी फोडली. 

त्यानंतर काही मिनिटांनी सायकलवरून जाणाऱ्या पिंटूकुमारला आरोपींनी अडवले. त्यांच्याकडे पैसे आणि मोबाईलची मागणी केली. पिंटूकुमारची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याने तो पैसे आणि मोबाईल देण्यास तयार नव्हता. पिंटूकुमारने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यात झटापट झाली, काही अंतरावर पिंटूकुमार पळून गेला आणि कचराकुंडीपाशी मोबाईल आणि काही पैसे लपवून ठेवले. हेच पाहून आरोपींनी पुन्हा पिंटूकुमार सोबत झटापट केली त्यात डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. आरोपी पैसे आणि मोबाईल घेऊन पसार झाले. दरम्यान, पिंटूकुमारचा पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या सर्वांची जबाबदारी पिंटूकुमारवर असल्याने या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान, दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सिद्धेश्वर कैलास, पोलीस कर्मचारी देवकर, हिंगे आणि सावंत यांच्या पथकाने तपासासाठी ८० सीसीटीव्हींची तपासणी केली. पोलिसांना धूसर दिसणाऱ्या दृश्यामधून केशभूषा आणि कपड्यावरून आरोपींचा शोध काढला. मुख्य आरोपी अभिषेक चंद्रकांत नलावडे उर्फ एनएनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता इतर चार अल्पवयीन मुलांची नावे पुढे आली असून त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. 

भोसरी MIDC परिसरात पोलीस गस्त वाढवण्याची गरज

पिंपरी-चिंचवड शहरात परराज्यातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी येतात. त्यांना भोसरी MIDC अशा ठिकाणी नोकरी लागते. मात्र येथील MIDC परिसर हा दहा नंतर अत्यंत निर्मनुष्य होतो. त्यामुळे अशा घटना घडतात. अशा परिसरात पोलीस गस्त वाढवण्याची गरज आहे हे या घटनेमुळे अधोरेखित झालं आहे. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune murder of youth in bhosari midc accused were handcuffed on clothes and hair abn 97 kjp

Next Story
पुणे : शिवी दिल्याच्या रागातून नातेवाईकाचा गोळ्या झाडून खून; आरोपीही जखमी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी