scorecardresearch

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राज ठाकरेंना पोस्टाने पाठवली पुस्तकं

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राज ठाकरेंना पोस्टाने पाठवली पुस्तकं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यातील उत्तर सभेतून बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना लक्ष केले. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राज ठाकरे यांना काही पुस्तके पोस्टाने पाठवून ही पुस्तक वाचन करण्याचा सल्ला दिला आहे.

‘प्रबोधन’ मधील प्रबोधनकार, लोक माझे सांगाती…. शिवाजी कोणा होता ? , देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे, गुलामगिरी, गुजरात फाईल्स ही पुस्तके मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने पोस्टाने पाठविण्यात आली आहेत.

राज ठाकरे यांनी काल भाषणात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शरद पवार हे जातीपातीचं राजकारण करतात. महाराष्ट्रात राष्ट्रवादी आल्यापासून चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. शरद पवार हे नास्तिक आहेत. असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ही कृती करण्यात आल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune nationalist youth congress sent books to raj thackeray by post msr 87 svk

ताज्या बातम्या