scorecardresearch

पुणे : प्रजासत्ताक दिनी आयुक्त कृष्ण प्रकाश यांची अनाथ मुलांना अनोखी भेट; संविधानाचे महत्त्व पटवून देत पुस्तकांचे वाटप

मुलांना लहान वयातच संविधानाचे बाळकडू दिले तर ते भविष्यातील अधिक जबाबदार नागरिक बनतील, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला

Republic Day Commissioner Krishna Prakash presents Constitution to orphans

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रजासत्ताक दिनाच औचित्य साधून अनाथ आणि आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना ब्लॅंकेट आणि संविधानच्या पुस्तकांचे वाटप केले आहे. संविधान दिल्याने मुल भविष्यातील जबाबदार नागरिक होतील अशी अपेक्षा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केली आहे. यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सतीश माने, मनीष कल्याणकर, जोगदंड, चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अनाथ आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना पोलीस आयुक्तांनी आगळीवेगळी भेट दिली. ब्लॅंकेट, चॉकलेटसह आधुनिक भारतातील मुलांचे भविष्य चांगले घडावे यासाठी कृष्ण प्रकाश यांनी मुलांना संविधानाचे पुस्तक भेट म्हणून दिले आहे. मुलांनी संविधान वाचले, ते समजून घेतले तरच त्यांना देश समजेल, असे पोलीस आयुक्त म्हणाले.  यावेळी आयुक्तांनी मुलांना संविधानाचे महत्त्व पटवून दिले. 

मुलांना लहान वयातच संविधानाचे बाळकडू दिले तर ते भविष्यातील अधिक जबाबदार नागरिक बनतील आणि पर्यायाने गुन्हेगारीलाही आळा बसेल असा विश्वास आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केला. दरम्यान, चॉकलेट, ब्लँकेट आणि संविधानाची प्रत दिल्याने मुले भारावून गेली होती. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune on republic day commissioner krishna prakash presents constitution to orphans abn 97 kjp