पिंपरी-चिंचवड शहरात राहणाऱ्या चौगुले कुटुंबियांनी मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त करत मोफत चहा ठेवला होता. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि समाजात वेगळा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं. गुरुवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत या मोफत चहाचा आस्वाद तब्बल दोन हजार नऊशे नागरिकांनी घेतला. कुटुंबात कन्यारत्न झाले आहे, असे आनंदाने तेथील कर्मचारी सांगत होते. चहा देत असताना गर्भातच मुलीची हत्या करू नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

चौगुले दांपत्याला दोन दिवसांपूर्वीच कन्यारत्न प्राप्त झाले. तिचा सन्मान आणि आदर करत मोफत चहा देण्याची संकल्पना राऊत कुटुंबाने ठेवली. मोफत चहा देऊन त्यांनी मुलगी जन्माचं केलेलं स्वागत आणि नागरिकांनी दिलेला प्रतिसाद खरच कौतुकास्पद आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील स्वप्नील चौगुले आणि अक्षय राऊत यांच्या मालकीच्या असलेल्या रत्ना अमृततुल्य चहा सेंटरमध्ये मोफत चहा ठेवला होता.

Dr Dharmesh Patel California accident
स्वतःच्या कुटुंबालाच मृत्यूच्या दरीत ढकल्यानंतर भारतीय व्यक्तीला अटक, सुनावणी सुरू असताना समोर आली धक्कादायक माहिती
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
fake documents for passport
पारपत्रासाठी बनावट कागदपत्र देणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल
Girl organ donation
शेतमजूर कुटुंबाचा धाडसी निर्णय; मुलीच्या अवयवदानातून…

आजही आपल्याकडे अनेक अशी लोकं आहेत जे कन्यारत्न प्राप्त झाल्यावर नाक मुरडतात. मुलीला जन्म देतात, परंतु त्यानंतर मात्र तिच्या आईला मुलगा का होत नाही म्हणून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जातो. आजही मुलगाच वंशाचा दिवा होऊ शकतो असा समज अनेकांच्या मनात आहे. काही जण गर्भातच मुलीचा ठार मारतात. राज्य शासनाकडून मुलींसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र, त्या अनेकदा फोल ठरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चौगुले आणि राऊत कुटुंबाने मुलीच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी उचललेलं पाऊल हे कौतुकास्पद असल्याचं अनेकांकडून सांगण्यात आलं.

“समाजात स्त्रीभ्रूणहत्या होत आहेत. त्यांना रोखण्यासाठी हे छोटेसे पाऊल आहे. मुलगी झाल्यानंतर तिची हत्या न करता स्वागत करायला हवं. राखी बांधणाऱ्या हाताला गर्भातच मारून टाकू नका, जनांनंतर तिचं स्वागत करावं,” असे अक्षय राऊत म्हणाले.