पुण्यातील उरुळी देवाची येथील प्लास्टिक भंगाराच्या गोदामाला बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशामक विभागाच्या आधिकायांनी दिलेल्या माहितीनुसार,उरुळी देवाची येथे लकी एन्टरप्राईजेस हे प्लास्टिकचे गोदाम आहे. आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास येथे आग लागली. आगीची वर्दी मिळताच अग्निशामन दल याठिकाणी तातडीने दाखल झाले. मात्र, अजूनपर्यंतही ही आग पूर्णपणे विझलेली नाही. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत दोन दुचाकी आणि एक ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. तसेच या आगीत जवळपास २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 20th Dec 2017 रोजी प्रकाशित
पुण्यात प्लास्टिक भंगाराच्या गोदामाला भीषण आग
आगीत जवळपास २० लाख रुपयांचे नुकसान
Written by लोकसत्ता टीम

First published on: 20-12-2017 at 10:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune plastic godown major fire uruli devachi