पुणे : लष्करसारख्या उच्चभ्रू परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यास आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून १ लाख ३७ हजार रुपये किमतीचा एमडी (मॅफेड्रोन) हा अमली पदार्थ पकडला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहंमद इब्राहिम तोहिद सैय्यद (वय २३, रा. कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शहरातील गांजा तसेच इतर अमली पदार्थांची तस्करी छुप्या पद्धतीने सुरू आहे. म. गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौकाकडून पुलगेटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका दुकानासमोर दुचाकीवरून आलेला एकजण एमडी हा अमली पदार्थ विक्री करत आहे, अशा माहितीची बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करण्यात आली. त्यानंतर सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून तरुणाला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ १ लाख ३७ हजार रुपयांचा एमडी हा अमली पदार्थ मिळून आला. तर त्याच्याकडील मोबाईल, करिझ्मा दुचाकी तसेच इतर ऐवज असा एकूण २ लाख ३ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. त्याला पुढील कारवाईसाठी लष्कर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police arrested drug dealer recovered mephedrone of rs 1 lakh 37 thousand pune print news zws
First published on: 30-06-2022 at 16:31 IST