पुण्यात रात्रीपासून सुरू असलेल्या कोसळधारेमुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. पुणेकरांचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. कोसळधार पावसामुळे अनेक ठिकाणावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुढील १२ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शहरातील मुसळधार पावसाने नागरिकांनो घाबरून जाऊ नका. काही अडचण निर्माण झाल्यास, जसे घरात पाणी शिरणे, घराच्या छतावर अडकून पडणे किंवा अन्य काही संकट आल्यास अग्निशमन दल, महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलिस मदत केंद्राशी संपर्क साधा.

संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे… 
पोलिस चौकशी केंद्र : 020-26208100
पालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष : (020) 25501269
फायर ब्रिगेड (अग्निशमन दल) : 101
ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्ष : 020-25657171
म.न.पा आपत्कालीन कक्ष – 9689931511

अग्नीशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात रात्री नऊ नंतर जोरदार पाऊस सुरू झाला. यामुळे शहरातील मध्य भागातील ओढे नाले काही मिनिटात तुडूंब वाहू लागले. यामुळे दांडेकर पूल येथील वसाहत, सिहगड रस्ता, बिबवेबडी, धनकवडी, सहकारनगर, कात्रज या भागामध्ये असणार्‍या सोसायटी, वसाहती आणि घरामध्ये पाणी भरल्याच्या घटना घडल्या.