कामाच्या ठिकाणी वाढती स्पर्धा, दैनंदिन जीवनातील अडचणी, आरोग्याच्या तक्रारी अशा अनेक कारणांमुळे ताणतणाव हा शहरी नागरिकांच्या जगण्याचा अनिवार्य भाग ठरत आहे. ताणतणावाचा भार हलका करण्यासाठी कोणी व्यायाम करतात, कोणी समुपदेशकांची भेट घेतात तर कोणी अनोळखी लोकांच्या समूहाबरोबर एकत्र येऊन ‘ड्रम’ वाजवतात.

हेही वाचा – पुणे : टीईटी गैरप्रकारातील ५७६ शिक्षकांचे ऑगस्टपासून वेतन न देण्याचे आदेश

How many applications filed under RTE only two days left to fill the application
आरटीई अंतर्गत किती अर्ज दाखल? अर्ज भरण्यासाठी राहिले दोनच दिवस!
former director of agricultural produce market committee arrested in toilet scam
कृषी उत्पन्न बाजार समिती : शौचालय घोटाळा, एक माजी संचालक  अटक तर दुसऱ्याची चौकशी, एपीएमसीत खळबळ 
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Asked not to ride a motorcycle after suffering a brain stroke, Kolkata man’s cycle now gets all the attention
ब्रेन स्ट्रोकमुळे व्यक्तीला बाईक चालवण्यास केली मनाई! बाईकवेड्याने सायकलची बनवली बाईक! पाहा Viral Video

करोना महासाथीमुळे लावण्यात आलेल्या सक्तीच्या टाळेबंदीचा काळ सोडल्यास इनोव्हेंट ड्रम सर्कल्सतर्फे ‘ड्रम सर्कल’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. आज (रविवार, २१ ऑगस्ट) या उपक्रमाचे २५ वे सत्र होत आहे. दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी या सत्राचे आयोजन केले जाते. विविध वयोगटातील, आर्थिक स्तरांतील नागरिक या उपक्रमाच्या निमित्ताने एकत्र येतात आणि ‘ड्रम’ वादन करतात. विशेष म्हणजे हा उपक्रम संपूर्ण मोफत आहे.

हेही वाचा – पुणे : शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी विद्यापीठाकडून ज्ञानसुधार उपचारात्मक उपक्रम ; १ सप्टेंबरपासून अंमलबजावणी

इनोव्हेंट ड्रम सर्कल्सचे वैभव देव म्हणाले,की ताणतणाव मुक्त होण्यासाठी ड्रम वादन करताना मार्गदर्शक व्यक्तीच्या सूचना ऐकणे आणि आपल्याला दिलेल्या वाद्यातून ताल निर्माण करणे या प्रक्रियेत सहभागी व्यक्ती गुंतून जातात. त्यामुळे डोक्यातील विचार, ताणतणाव यांचा शब्दश: विसर पडतो. वाद्य वाजवणे या प्रक्रियेत नैसर्गिकपणेच आनंदाची भावना निर्माण करणारी संप्रेरके स्त्रवतात. ड्रम सर्कल या उपक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणारे सदस्य एकमेकांना प्रश्न विचारत नाहीत. त्यांच्याबाबत मते बनवणे, शिक्के मारणे यातले काहीही करत नाहीत. निखळ आनंदासाठी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट कंपन्यांसाठीही या उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे देव यांनी स्पष्ट केले.

कसे सहभागी व्हाल?
कम्युनिटी ड्रम सर्कल उपक्रमाचे २५ वे सत्र गरवारे महाविद्यालयात आज (रविवार – २१ ऑगस्ट) संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत होत आहे. हा उपक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.