दहशत माजविणाऱ्या गुंडाला गुन्हे शाखेने पकडले. त्याच्या बरोबर असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. विवेक गवळी (लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे आणि त्याच्याबरोबर असलेल्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले. लोहगाव भागात अनिल विटकर याच्यावर वादातून अक्षय नागरे, स्वप्नील भालेकर, कुणाल देशमुख, आकाश सोनवणे आणि साथीदारांनी हल्ला केला होता. टोळक्याने परिसरात दहशत माजविली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी टोळक्याचा पाठलाग केला होता.

दहशत माजविणे तसेच खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात गवळी आणि त्याच्या बरोबर असलेला एक अल्पवयीन मुलगा सामील असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारला मिळाली. त्यानंतर सापळा लावून दोघांना ताब्यात घेण्यात आले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, उपनिरीक्षक जयदीप पाटील, महेंद्र पवार, राजस शेख, नागेशसिंग कुंवर, प्रवीण भालचिम आदींनी ही कारवाई केली.

pune police warning goons after Salman Khan House Firing Case
सलमान खानच्या घराजवळ गोळीबार, पुण्यातल्या ‘भाईं’ची झाडाझडती
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
High Court restrains demolition of loom department in Mafatlal
मफतलालमधील यंत्रमाग विभाग पाडण्यास उच्च न्यायालयाचा मज्जाव
Crime against four for polluting Pavana river
पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा