धक्कादायक! मसाल्यात पाणी पडल्यामुळे आईने दिले मुलीला चटके

सतर्क शेजाऱ्यामुळे प्रकार उघड

Loksatta, Loksatta news, loksatta newspaper, marathi news, marathi, Marathi news paper, Marathi news online, Marathi, Samachar, Marathi latest news, pune, pune news in marathi, pune, woman, beaten up, daughter, case, registered, hadapsar police station
प्रतिकात्मक छायाचित्र

घरात खेळताना मसाल्यात पाणी पडल्यामुळे एका महिलेने तिच्या पाच वर्षांच्या मुलीला चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी महिलेविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसरमधील गोंधळेनगर येथे राहणारे रजनीश तिवारी यांच्या शेजारी पाच वर्षांची मुलगी राहते. शुक्रवारी लहान मुलगी नेहमीप्रमाणे त्यांच्या घरात गेली. त्या मुलीच्या अंगावर मारहाणीचे व्रण दिसले. त्यांनी मुलीला विचारणा केली असता मुलीने आईने चटके दिल्याचे सांगितले. मी खेळत असताना माझ्यामुळे मसाल्यात पाणी पडले, यामुळे आईने चटके दिले, असे तिने सांगितले. रजनीश तिवारी यांनी पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pune woman beaten up daughter case registered in hadapsar police station

ताज्या बातम्या