पिंपरी-चिंचवड : पिंपरी- चिंचवडमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या स्पा सेंटरचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने पर्दाफाश केला आहे. उच्चभ्रू असलेल्या पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात स्पा सेंटर सुरू होते. वेश्याव्यवसाच्या जाळ्यातून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.

अक्षय धनराज पाटील (स्पा मॅनेजर), रोहन समुद्र (स्पा मालक) आणि भूषण पाटील (स्पा मालक) यांचा वाकड पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भा.द.वी कलम ३७० (३),३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ravindra dhangekar on pune accident
“पुणे अपघातप्रकरणात २-३ व्यक्तींना पद्धतशीरपणे गायब केलंय”, रवींद्र धंगेकरांचा नवा आरोप; रोख नेमका कोणावर?
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाची आई कॅमेरासमोर ढसाढसा रडली, म्हणाली; “प्लीज..”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य

आणखी वाचा-“पुणे अपघातप्रकरणात २-३ व्यक्तींना पद्धतशीरपणे गायब केलंय”, रवींद्र धंगेकरांचा नवा आरोप; रोख नेमका कोणावर?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पा सेंटर च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना मिळाली. पोलिसांनी पिंपळे सौदागर येथील अँपल ब्युटी सल्यून अँड स्पा सेंटर येथे जाऊन खरच त्या ठिकाणी स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालतो का? याची खात्री केली. मग, तिथं एक पथक पाठवलं आणि छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी दोन महिलांची सुटका यातून केली. यात महाराष्ट्रीयन आणि आसाम येथील महिलांचा समावेश आहे. स्पा मालक आणि मॅनेजर यांचा शोध सुरू असून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.