scorecardresearch

कामशेत-वडगाव दरम्यानचे रेल्वे फाटक दोन दिवस बंद

कामशेत-वडगाव स्थानकांदरम्यानच्या रेल्वे फाटकाच्या दुरुस्तीचे काम शुक्रवार आणि शनिवारी दोन टप्प्यात करण्यात येणार आहे

कामशेत-वडगाव दरम्यानचे रेल्वे फाटक दोन दिवस बंद
(संग्रहित छायाचित्र)

पुणे : पुणे-लोणावळा मार्गावरील कामशेत आणि वडगाव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान असलेले रेल्वे फाटक रस्ते वाहतुकीसाठी शुक्रवार आणि शनिवारी (१९, २० ऑगस्ट) संध्याकाळपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे पुणे रेल्वेकडून कळविण्यात आले आहे. वाहन चालकांनी जवळील पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. कामशेत-वडगाव स्थानकांदरम्यानच्या रेल्वे फाटकाच्या दुरुस्तीचे काम शुक्रवार आणि शनिवारी दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी सकाळी दहापासून संध्याकाळी पाचपर्यंत हे फाटक रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहे. दुरुस्तीच्या कालावधीत या रेल्वे फाटकापासून काही अंतरावर असलेल्या फाटक क्रमांक ४३ नाने गेट वाहतुकीसाठी खुले राहील. या पर्यायी मार्गाचा वाहन चालकांनी वापर करावा, असे आवाहन पुणे रेल्वेकडून करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.