पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसं पत्रक काढण्यात आलं आहे. वैष्णवी शशांक हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादीचं नाव जोडलं जात होतं. त्यामुळे अखेर राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे यांची हकालपट्टी करण्यात आली.

शुक्रवारी वैष्णवी शशांक हगवणे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर अवघ्या राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तेच हुंड्यातील फॉर्च्युनर गाडीची चावी शशांकला देण्यात आली होती.

सोशल मीडियावर चावी देतानाचा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी होत असल्याचंदेखील बोललं जात होतं. अखेर यावर पाऊल उचलत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. अद्याप दोघेही फरारी असून, त्यांचा शोध पिंपरी-चिंचवड पोलीस घेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतर तिघांना बावधन पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांना २६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण राजकीय वळण घेत असल्यानं अखेर बाप-लेकाची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता तरी पोलीस राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे यांच्यापर्यंत पोहोचतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.