वसंतदादा सेवा संस्था आणि प्रियंका महिला उद्योग संस्था यांच्या वतीने देण्यात येणारा ‘राजीव गांधी कला गौरव’ पुरस्कार अभिनेत्री स्मिता तांबे यांना जाहीर झाला आहे. तसेच ‘क्रीडा गौरव’ पुरस्कार क्रिकेटपटू किरण मोरे यांना देण्यात येणार आहे.
अकरा हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. स्मिता तांबे यांना ‘कला गौरव’ पुरस्कार २१ मे रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी ६.३० वाजता ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या वेळी उल्हास पवार, मोहन जोशी, विनायक निम्हण उपस्थित असतील. किरण मोरे यांना ‘क्रीडा गौरव’ पुरस्कार ३१ मे रोजी नेहरू स्टेडियम येथे सायंकाळी ६.३० वाजता माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. कार्यक्रमाला बाबासो लांडगे, सुनंदन लेले उपस्थित राहणार आहेत.