आजीकडे राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीने अपत्याला जन्म दिला आहे. आनंद हरी पवार (वय ४५, रा. मूळ गाव चिंचोली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीडित मुलगी ही आई-वडील नसल्याने गेल्या तीन वर्षांपासून आपल्या आजीकडे राहते. संशयित आनंद पवार हा गेल्या १० वर्षांपासून पीडित मुलीच्या आजीच्या घराशेजारी भाड्याने राहतो. आनंद पवार हा चालक म्हणून काम करतो. रात्री-अपरात्री घरी आल्यानंतर पाणी पिण्याच्या किंवा इतर बहाण्याने तो पीडित मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत. मी तुझा सांभाळ करतो, लग्न लावून देतो, घर देतो असे आमिष दाखवत. पीडितेच्या इच्छेविरूद्ध १७ मार्च २०१६ ते डिसेंबर २०१६ या काळात वारंवार त्याने तिच्यावर बलात्कार केला. यात पीडित मुलगी गर्भवती राहिली व तिने एका अपत्याला जन्म दिला.
याप्रकरणी पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आनंद पवार याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक आर.टी. सावंत अधिक तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape on minor girl at pimpri chinchwad one arrested
First published on: 12-01-2017 at 10:45 IST