संघ आणि भाजपा एक दिवस संपेल

रामाला विकल्यानंतर संपूर्ण देश विकायला निघाला आहात. तुम्ही कधी चहा विकला की नाही, मात्र रेल्वेचे चारशे प्लॅटफॉर्म विकायला बैचेन झालात. सत्ताधाऱ्यांना चरबी चढली आहे. पण एवढं लक्ष्यात ठेवा मोदी, अमित आणि भागवत हे युग अन युग राहणार नाहीत. संघ आणि भाजपा एक दिवस संपेल असा विश्वास गुजरात राज्याचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी व्यक्त केला आहे.

ते पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित भारतीय संविधान जनजागृती अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. आमदार मेवानी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्यात खूप फरक आहे. आम्ही दोघे ही गुजरात चे आहोत. मात्र, मोदी यांच नात हे नथुराम गोडसे, हेडगेवार आणि सावरकर यांच्या सोबत आहे. तर माझे नाते शाहू, फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत आहे. त्यांना संविधानाला संपवून मनुस्मृती आणायची आहे असे ते म्हणाले.

यावेळी अमित शहा यांच्यावर निशाणा साधत मेवानी म्हणाले, भारताचे सौंदर्य हे विविधतेमध्ये आहे. हिंदी तर बोलाच पण ते आपल्याला बोलणं बांधरकारक करू शकत नाहीत. त्यांचा खूप प्रेमाने खेळ सुरू आहे. तामिळनाडू, केरळ येथे जाऊन म्हणतील स्थानिक भाषा ऐवजी हिंदीच बोला. काय बोलायचे ते आम्ही ठरवू हा अधिकार संविधानाने दिला आहे असा टोला त्यांनी शहा यांना लगावला आहे.