अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रसिद्ध आरसीसी कन्सल्टंट आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक यशवंत शंकर ऊर्फ वाय. एस. साने (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले. प्रसिद्ध लेखक-विचारवंत राजीव साने हे त्यांचे चिरंजीव असून प्रसिद्ध समीक्षक प्रा. रेखा इनामदार-साने या स्नुषा आहेत.
अभियांत्रिकी शिक्षण संपल्यानंतर १८ वर्षे वाय. एस. साने यांनी अध्यापनाचे कार्य केले. वाय. एस. साने स्ट्रक्चरल कन्सल्टंट्स या संस्थेमार्फत स्वतंत्र व्यवसाय सुरू करीत त्यांनी मोठा लौकिक संपादन केला. १९७० आणि १९८० च्या दशकातील नव्याने विस्तारलेल्या बहुतांश सर्व प्रसिद्ध वास्तुप्रकल्पांच्या उभारणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. स्ट्रक्चरल डिझायनिंग विषयातील तज्ज्ञतेमुळे त्यांनी अनेक परिषदांचे अध्यक्षपद भूषविले. साने यांनी राज्यातील अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांना भरघोस अर्थसाह्य़ केले. खऱ्या अर्थाने सेल्फ मेड मॅन ही त्यांची ओळख होती.
संग्रहित लेख, दिनांक 12th May 2014 रोजी प्रकाशित
प्रसिद्ध आरसीसी कन्सल्टंट वाय. एस. साने यांचे निधन
अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रसिद्ध आरसीसी कन्सल्टंट आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक यशवंत शंकर ऊर्फ वाय. एस. साने (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले.
First published on: 12-05-2014 at 01:11 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rcc consultant y s sane passed away