वरिष्ठ महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापकपदासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) परीक्षा २० ते २८ जूनदरम्यान होणार आहे. त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया १ मार्चपासून सुरू होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आतापर्यंत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएससी) नेट परीक्षा घेतली जात होती. आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) ही परीक्षा घेतली जाते. डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेली नेट पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने झाली. आता जूनमध्ये होणारी परीक्षाही ऑनलाइनच होणार आहे. परीक्षेत नव्या अभ्यासक्रमावर आधारित दोन प्रश्नपत्रिका असल्याचे एनटीएने संकेतस्थळावर नमूद केले आहे.

सहायक प्राध्यापक किंवा कनिष्ठ संशोधन पाठय़वृत्ती या दोन्ही पदांसाठीच्या जूनमध्ये होणाऱ्या नेट परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे.

त्यानुसार नेट ऑनलाइन पद्धतीने २० ते २८ जूनदरम्यान होईल. त्यासाठी १ ते ३० मार्चदरम्यान नोंदणी करता येईल.

या परीक्षेचा निकाल १५ जुलैच्या सुमारास जाहीर करण्यात येणार असल्याचे एनटीएने स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Registration for net examination from 1st march
First published on: 06-02-2019 at 02:08 IST