बर्गरचे पैसे मागितल्याने खाद्यपदार्थ विक्रेत्याला टोळक्याने मारहाण केल्याची घटना बी. टी. कवडे रस्त्यावर घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अजय पवार, आदीनाथ गायकवाड, अजित हाके (तिघे रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- पुणे: हडपसरमधील मजुराच्या खून प्रकरणातील आरोपीला दिल्लीत अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत निखिल गंगाधर बनकर (वय ३२, रा. घोरपडी गाव) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बी. टी. कवडे रस्त्यावर बनकर यांचे पिझ्झा टोन्स नावाचे उपाहारगृह आहे. आरोपी पवार, गायकवाड, हाके उपाहारगृहात आले. त्यांनी बर्गर मागविले. बनकर यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. तेव्हा आरोपींनी बनकर यांना मारहाण केली. त्यांना धमकावून खिशातील ८०० रुपयांची रोकड काढून घेतली. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.