रेवा नातू यांना ‘संगीताचार्य’ पदवी

अखिल भारतीय गांधर्व मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या ‘संगीताचार्य’ या परीक्षेत गायिका रेवा नातू यांना सर्वोच्च गुण मिळाले आहेत.

अखिल भारतीय गांधर्व मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या ‘संगीताचार्य’ या परीक्षेत गायिका रेवा नातू यांना सर्वोच्च गुण मिळाले आहेत. ८ जून रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या दीक्षान्त समारंभात त्यांना पदवी प्रदान करण्यात येईल.
नातू यांना ‘संगीताचार्य’ व ‘गायन’ या विषयात सर्वाधिक गुण मिळाल्याने त्यांना नऊ पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये ‘गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुस्कर’, ‘विनायकराव पटवर्धन’, ‘पं. यशवंतबुवा मिराशी’ यांच्यासह अन्य सहा पुरस्कारांचा समावेश आहे. संगीताचार्य परीक्षेसाठी शास्त्रीय गायन,तसेच शाेधनिबंध सादर केला हाेता.  ‘कालानुरुप होणारे संगीताच्या सादरीकरणातील बदल : ग्वाल्हेर गायकीच्या संदर्भात’ हा त्यांच्या शोधनिबंधाचा विषय होता. डॉ. दिग्विजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Reva natu gets sangitacharya award

Next Story
स.पां.देशपांडे
ताज्या बातम्या