मुळा-मुठा नदी सुधारणा योजनेंतर्गत महापालिकेला २६ कोटी रुपयांचा निधी भूसंपादनासाठी उपलब्ध झाला असला तरी नदी सुधार योजनेचे काम प्रत्यक्ष केव्हा सुरू होणार याबाबत साशंकताच आहे. केंद्र सरकारने हे काम महापालिकेकडून काढून घेतले असून, सल्लागार नियुक्तीची प्रक्रियाही वर्ष झाले तरी पूर्ण झालेली नाही. सल्लागाराची नियुक्ती करण्यात आलेली नसल्यामुळे योजनेचा प्रकल्प आराखडाही तयार झालेला नाही. त्यामुळे निधी मिळाल्यानंतरही सल्लागाराअभावी नदी सुधारणा योजना रखडण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात प्रतिदिन तयार होणाऱ्या सांडपाण्यापैकी काही पाण्यावर प्रक्रिया न करता ते नदीपात्रात सोडण्यात येत असल्यामुळे मुळा-मुठा नद्या मोठय़ा प्रमाणावर प्रदुषित होत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे महापालिकेकडून नदी सुधारणा योजना हाती घेण्यात आली. त्यासाठी केंद्राच्या राष्ट्रीय नदी सुधार योजनेअंतर्गत हा प्रकल्प महापालिकेने केंद्राकडे पाठवला होता. मात्र त्यासाठी कोटय़वधी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्यामुळे केंद्राने राष्ट्रीय नदी सुधार योजनेअंतर्गत या प्रकल्पाचा समावेश न करता जपानमधील जायका कंपनीकडून वित्तीय साहाय्य घेऊन पूर्ण करण्यात येईल, असे जाहीर केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: River improvement plan get fund for mula river cleaning
First published on: 29-03-2017 at 01:56 IST