पुणे जिल्ह्यातील चाकण-शिक्रापूर मार्गावर झालेल्या दुचाकी व अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघे ठार झाले. हा भीषण अपघात सोमवारी रात्री शिक्रापूर गावाजवळ घडला. हणमंत ठाकर हे दुचाकीवरून पत्नी व मुलासह गावाकडे निघाले होते. गतिरोधक दिसल्याने त्यांनी अचानक दुचाकीचा ब्रेक दाबला. त्याचवेळी भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने ठाकर यांच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली. यात दुचाकीवर बसलेले हणमंत ठाकर त्यांची पत्नी व मुलगा हे ठार झाले. या रस्त्यावर यापूर्वीही अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Nov 2016 रोजी प्रकाशित
चाकण-शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघे मृत्यूमुखी
भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने ठाकर यांच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 14-11-2016 at 22:34 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road accident at chakan shikrapur road three dead