पुण्यातील औंध परिसरात परिहार चौकात नाकोडा ज्वेलर्सवर गुरुवारी पहाटे दरोडा पडला. या घटनेत १५ ते २० लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे स्थानिक परिसरात सोने व्यापारांमध्ये खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन ते चार चोरट्यांनी दुकानाचे शटर उघडून दुकानात प्रवेश केला. यानंतर दुकानात असलेले सोन्यांचे दागिने व इतर मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery attempt in pune jewelers shop at thursday morning psd
First published on: 17-10-2019 at 11:34 IST